महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना जालना जिल्ह्यात समोर आलेली असून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तलवारीने वार करून खून केलेला आहे. जालना शहरात ही घटना उघडकीला आलेली असून आरोपी पत्नीला प्रियकरासोबत ताब्यात घेण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे ही महिला सात मुलांची आई असून त्यानंतर तीन मुले असलेल्या एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झालेले होते . जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात म्हाडा कॉलनी इथे हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रमोद झिने ( राहणार म्हाडा कॉलनी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो एका खाजगी ठिकाणी कामाला होता. रात्री कामावरून तो घरी आला मात्र सकाळी घराच्या अंगणात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या पत्नीने आपल्या पतीची हत्या झाल्याची तक्रार पोलिसात केली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आपल्या पतीचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होते आणि तिने ही हत्या घडवून आणली असा आरोप प्रमोद याच्या पत्नीने केला. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि जालना जिल्ह्यातील वाळूज परिसरातून त्या महिलेला देखील ताब्यात घेतले मात्र त्या महिलेने गेल्या सहा महिन्यांपासून आमच्यातील प्रेमसंबंध संपलेले असून आम्ही सहा महिने एकमेकांना भेटलेलो देखील नाही असे देखील तिने सांगितले.
प्रमोदच्या घराच्या आसपास देखील पोलिसांनी चौकशी केली मात्र रात्री कुणी अज्ञात व्यक्ती येथे आढळून आलेला नाही असे शेजाऱ्यांनी सांगितले जर अज्ञात व्यक्ती आला असता तर कुत्री भुंकली असती मात्र तसेही काही झाले नाही असे समोर आले. घटना घडली त्या दिवशी प्रमोद हा दारू पिऊन घरी आलेला होता त्यानंतर दाराच्या अंगणात तो बाज टाकून झोपलेला होता. ज्या रात्री प्रमोदचा खून झाला त्या रात्री कुत्रा देखील भुंकला नाही ही माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर घरातील व्यक्तींनीच प्रमोद याचा खून केल्याची शक्यता पोलिसांना वाटू लागली आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपास सुरू केला.
घरात केवळ पत्नी आणि लहान मुले होती . लहान मुले तर हत्या करू शकत नाहीत त्यामुळे पोलिसांनी प्रमोद याची पत्नी अशा हिला ताब्यात घेतले सुरुवातीला तिने आपण हा खून केलेला नाही असे सांगितले मात्र पोलीस ही खाक्या दाखवल्यानंतर तिने प्रमोद याच्या हत्येची कबुली दिली असून अनैतिक संबंधात तो अडसर ठरत होता म्हणून आपण त्याचा खून केलेला आहे असे सांगितले आहे.
प्रमोद आणि आशा यांचा विवाह वीस वर्षांपूर्वी झालेला होता त्यांना तब्बल सात मुले असून त्यामध्ये सहा मुली आणि एक मुलगा आहे. दरम्यानच्या काळात आशा हिचे रेवगाव येथील रुपेश शिंदे नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळलेले होते. रुपेश शिंदे हा देखील विवाहित असून त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोलमजुरीची कामे तो करत असून त्यांच्या या प्रेमात प्रमोद हा अडसर ठरत होता त्यामुळे त्याला मारण्याचा प्लॅन बनवण्यात आला अन घटना घडली त्या दिवशी सकाळी रुपेश याने एक धारदार तलवार आशा हिला आणून दिलेली होती ती तिने घरात लपून ठेवली.
प्रमोद हा दारू पिऊन आल्यानंतर दारूच्या नशेत तो असल्याने आपले काम आणखीनच सोपे झालेले आहे याचा आशा हिला अंदाज आला आणि तो झोपेत असतानाच आशा हिने त्याच्यावर तलवारीने वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला. आशा हिने त्यानंतर त्याच्या हातातील कडे आणि गळ्यातील चैन रुपेशला नेऊन दिली आणि जणू काही चोरीच्या उद्देशाने हा खून झालेला आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पोलिसांना प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यात यश आलेले असून दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.