‘ मसाज पार्लर ‘ नावालाच अन आत.., कोरेगाव पार्कमध्ये थायलँडच्या तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून उच्चभ्रू भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची अनेक प्रकरणे समोर येत असून पिंपरी येथील पंचतारांकित प्रकरणानंतर पुन्हा पुण्यातील उच्चभ्रू एरिया म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव पार्क येथे मसाज पार्लरच्या नावाखाली चक्क वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीला आणलेला आहे.

पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक थायलंडमधील तीन तरुणी तिथे आढळून आलेली असून एकूण पाच जणींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. मसाज सेंटरचा चालक याच्यासोबत दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळालेली होती त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक तिथे पाठवले आणि त्यानंतर खात्री झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

मसाज पार्लरमधून सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी तीन तरुणी थायलंडमधील असून त्यांच्यासोबत इतर दोन तरुणी आढळून आल्या . निरीक्षण ग्रहात त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे. मसाज सेंटरचा चालक आणि इतर दोन जणांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव , सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे .


Spread the love