पुण्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून कामाला जाण्यासाठी डबा बनवून दिला नाही म्हणून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नीला केलेल्या मारहाणीत अखेर तिचा मृत्यू झालेला आहे. कोंढवा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी पतीला अटक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शितल सोमनाथ पांडागळे ( वय 27 ) असे मयत पत्नीचे नाव असून सोमनाथ महादेव पांडागळे ( वय 30 राहणार उंड्री होले वस्ती ) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली होती.
शितल पांडागळे यांना फिट येण्याचा त्रास होता. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी रुसून रुग्णालयात उपचारासाठी आणलेले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंगावर जखमा दिसून आल्याने डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल दिलेला होता त्यानंतर तिचा पती सोमनाथ यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आलेला आहे.
सोमनाथ याला शनिवारी कामाला जायचे होते मात्र शितलने त्याला डबा भरून दिला नाही त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले तेव्हा सोमनाथ याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात आणि पायावर तसेच अंगावर मारहाण केली त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झालेला होता. तिला फिटेचा त्रास होता असे सांगत सोमनाथ यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पोलिसांच्या चौकशीत तो पोपटासारखा बोलू लागला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत असल्याची माहिती आहे.