व्हिडीओ व्हायरल होताच पुण्यातील ‘ ते ‘ दोन्ही पोलीस निलंबित

Spread the love

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत असून वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांची नेमणूक केली जाते . वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूक चालकांवर वाहन चालकांवर कारवाई न करता पैसे उकळणाऱ्या स्वारगेट वाहतूक विभागातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केलेले आहे. एका सामान्य नागरिकाने दोन्ही पोलीस पैसे उकळत असल्याचा एक व्हिडिओ बनवून पुणे शहर वाहतूक पोलीस या ट्विटर खात्याला टॅग केलेले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हवालदार म्हणून काम करणारे बाबू दादा येडे आणि गौरव रमेश उभे अशी कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही पोलिसांची नावे आहेत . स्वारगेट वाहतूक विभागात त्यांची नेमणूक असताना 17 तारखेला सकाळी दहा ते पावणेअकराच्या दरम्यान गंगाधाम आई माता मंदिर रस्त्यावर वाहतूक नियमन करत असताना वाहन चालकाकडून ते पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केलेला होता.

मोबाईल मधील हा व्हिडिओ समोरील व्यक्तीने ट्विटरवर वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत शेअर केला त्या व्हिडिओमध्ये हे दोघेही वाहन चालकांवर कारवाई न करता पैसे उकळताना दिसून येत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळून आल्यानंतर उपयुक्त विजयकुमार मगर यांनी त्यांना निलंबित केलेले आहे.


Spread the love