पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सिंहगड रोडवरील नऱ्हे परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात समोर आलेले असून महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा संगणक प्रयोगशाळेतील सहाय्यक व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. मंगळवारी ही घटना उघडकीला आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महेश विठ्ठल कडू ( वय 35 राहणार किरकिटवाडी सिंहगड रस्ता ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे . परिसरातील एका महाविद्यालयात नोकरीला आहे त्यावेळी आरोपी कडू याने संगणक प्रयोगशाळेत पंखा सुरू करण्याच्या बहाण्याने महिलेला बोलावून घेतलेले होते आणि त्यानंतर तिच्यासोबत अश्लील वर्तन केले असे पीडित महिलेचे म्हणणे आहे . सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.