‘ आपण श्रीमंत गरीब असा भेदभाव मानत नाही ‘, ‘ त्या ‘ रात्री ती रडू लागली अन..

Spread the love

आपण श्रीमंत गरीब असा भेदभाव मानत नाही असे म्हणत एका व्यक्तीने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते त्यानंतर त्याने तिचे वेळोवेळी लैंगिक शोषण केले . फेब्रुवारी 2022 पासून तर मे 2023 पर्यंत हा प्रकार सातत्याने सुरू होता मात्र ऐन वेळेस त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर या तरुणीने अखेर अमरावती येथे खोलापुरी गेट पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पूर्वल थोटे ( राहणार अंबिकानगर अमरावती ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परिसरात भाड्याने खोली घेऊन घरकाम करत असलेल्या या तरुणीची डिसेंबर 2021 मध्ये आरोपीसोबत ओळख झालेली होती फिर्यादी तरुणीने त्यावेळी त्याला मी फक्त दहावी शिकलेली आहे. माझी घरची परिस्थिती देखील कमकुवत आहे. तू सुशिक्षित घरातील आहेस तुला चांगली मुलगी मिळेल असे सांगत त्याला नकार दिलेला होता मात्र त्यानंतर त्याने आपण श्रीमंत गरीब असा भेदभाव मानत नाही शिक्षणाला फारसे महत्त्व देत नाही असे सांगत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते.

काही दिवस उलटल्यानंतर आरोपीने फेब्रुवारी 2022 मध्ये फिरायला जाण्याच्या पाहण्याने व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिला सोबत घेतले आणि शेगाव येथील एका गेस्ट हाउसवर घेऊन गेला तिथे गेल्यानंतर आपण लवकरच लग्न करणार आहोत असे म्हणत त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली मात्र तरुणीने त्याला नकार दिल्यानंतर तू बाहेर गेली तर आपलीच बदनामी होईल पोलीस मला त्रास देतील असे म्हणत तिचे लैंगिक शोषण केले. पीडित तरुणी ही रात्रभर रडत होती त्यानंतर त्याने तिने उद्याच माझ्यासोबत लग्न कर अशी त्याला गळ घातली त्याला त्याने होकार दिला.

दुसऱ्या दिवशी आरोपी हा मंगळसूत्र हार सिंदूर आणि एक भटजी घेऊन शेगाव येथील त्याच ठिकाणी परत आला आणि भटजीने त्यांचे लग्न लावून दिले त्यानंतर दोघेही अमरावतीला पोहोचले. आरोपी तिला तिच्या भाड्याच्या खोलीच्या भाड्याच्या खोलीवर भेटायला यायचा तिथे देखील त्याने अनेक वेळा तिचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला तुला स्वीकारण्यास मला आई-वडिलांनी नकार दिलेला आहे असे म्हणत तो तिथून निघून गेला. फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर त्याने तिच्यासोबत बोलणे कमी केले तिचे आलेले फोन देखील तो उचलत नसायचा. त्याचे आई-वडील त्याचे इतरत्र लग्न लावून देणार आहेत याची कुणकुण या तरुणीला मिळाली आणि त्यानंतर ती त्याच्या घरी पोहोचली मात्र त्याच्या घरच्यांनी तिचे काहीच ऐकून न घेता तिला हाकलून दिले त्यामुळे अखेर तिने वीस मे रोजी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत


Spread the love