नऊ वर्षे सात जणांचा अत्याचार , बीडच्या घाटात नेल्यावर गर्भवती झाली अन..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात समोर आलेली असून रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी २०१४ पासून २०२३ पर्यंत वेळोवेळी या महिलेवर अत्याचार केले. गुरुवारी ही घटना समोर आलेली असून माजलगाव शहर ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप पिंपळे असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून तो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. त्याच्या गाडीमध्ये एका विधवा महिलेची पर्स राहिलेली होती त्यानंतर पिंपळे याने ती देण्याच्या बहाण्याने बीडमधील कबाड गल्ली इथे त्याच्या रूमवर महिलेला बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. 2014 मध्ये ही घटना घडलेली होती यावेळी आरोपीने या प्रकरणाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यासोबत अत्याचार करत होता.

काही दिवस उलटल्यानंतर आरोपीने त्याचा नातेवाईक असलेला गोरख इंगोले याला देखील महिलेची ओळख करून दिली आणि तिला त्याच्यासोबत देखील शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पुढे गोरख इंगोले याने देखील ब्लॅकमेल सुरू केले त्यानंतर गोरख इंगोले याचा भाऊ बालाजी इंगोले यांनी 2015 मध्ये महिलेवर ब्लॅकमेल करत अत्याचार केला आणि असाच प्रकार इतरांसोबत देखील महिलेला करायला लावला .

2020 मध्ये गोरख इंगोले याने महिलेला दुचाकी वर बसून एका घाटामध्ये नेले आणि तिच्यावर तब्बल चार जणांनी तब्बल सहा तास वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केले. पीडित महिला अखेर गर्भवती राहिली त्यानंतर गोरख याने महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले. सतत हा छळ सहन करण्याच्या पलीकडे परिस्थिती गेल्यानंतर महिला अखेर माजलगावला आली आणि एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला लागली .

आता तरी आपल्यावरील अत्याचार संपतील अशी तिला आशा होती मात्र वरील तीनही आरोपी सातत्याने तिच्याकडे येऊन शरीरसुखाची मागणी करू लागले त्यानंतर महिलेने अखेर माजलगाव शहर ठाण्यात फिर्याद दिलेल्या असून संदीप पिंपळे ( राहणार कबाड गल्ली बीड ) , बालाजी इंगोले ,गोरख इंगोले ( दोघेही राहणार धानोरा तालुका बीड ) यांच्यासोबत अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.