
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून याप्रकरनात पीडित मुलगी ही अल्पवयीन असून नगर जिल्ह्यातील आहे. मुंबई पाहण्यासाठी म्हणून मुलीचा काका तिला मुंबईला घेऊन गेलेला होता त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले .आरोपीचे वय 46 वर्ष असून या नराधम काकाला विशेष न्यायालयाने 14 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे.अल्पवयीन मुलीला मुंबई पाहायला घेऊन जाण्याच्या पाहण्याने आरोपी तिला मुंबईला घेऊन गेलेला होता त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले त्यातून पीडित मुलीला दिवस गेल्यानंतर अखेर डीएनए चाचणी करण्यात आली त्यामध्ये मात्र आरोपी हा मुलीच्या पोटात असलेल्या गर्भाचा जन्मदाता नसल्याचे समोर आले
सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसऱ्या विवाह केलेला होता तोपर्यंत मुलगी आजोळी होती . 2016 मध्ये मुंबईत राहणाऱ्या काकांनी तिला मुंबई पाहण्यासाठी नगरवरून मुंबईला आणलेले होते. काही दिवसांनी काकी पुन्हा नगरला निघून गेली त्याचा गैरफायदा घेत काकाने तिच्यावर अत्याचार केले.
पीडित अल्पवयीन मुलगी नगरला आली यावेळी तिने मामीला हा प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीत ही मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार समोर आलेला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताना डीएनए अहवालात आरोपीला पीडीतेच्या मुलाचे वडील म्हणून नाकारण्यात आलेले असले तरी लैंगिक अत्याचारासाठी त्याला दोषी ठरवले जाऊ शकते असे म्हणत शिक्षा ठोठावली आहे.