कोथरूडच्या ‘ त्या ‘ कंपनीविरोधात तेवीस जणांच्या तक्रारी

पुण्यात एक फसवणुकीचा अद्भुत प्रकार समोर आलेला असून फेसबुक इंस्टाग्राम यावर जाहिरात करून मेकअप आर्टिस्ट ,हेअर स्टायलिस्ट ,फोटोग्राफर , मॉडेल अशा स्वरूपाचे प्रशिक्षण देऊ आणि त्यानंतर काम देखील मिळवून देऊ या बहाण्याने शेकडो तरुण तरुणींची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे . कोथरूड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, श्रद्धा चंद्रकांत अंदुरे , योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज चावजी ,शुभम जयप्रकाश पगारे ,अनिरुद्ध बिपिन रासने ( सर्वजण राहणार कोथरूड ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पल्लवी सुगंध नावाच्या एका महिलेने या प्रकरणी कोथरूड पोलिसात फिर्याद नोंदवलेली आहे. आतापर्यंत तब्बल 23 जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या 100 च्या पुढे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संशयित असलेल्या आरोपींनी क्लिक अंड ब्रश नावाने कंपनी स्थापन केलेली होती. कोथरूडच्या भुसारी कॉलनी कंपनीचे कार्यालय देखील होते. आरोपींनी फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप यावर स्वतःच्या कंपनीची जाहिरात केली त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट ,हेअर स्टाईल ,फोटोग्राफर ,मॉडेल ,फॅशन डिझायनर अशा स्वरूपाची कामे मिळून देऊ असे आमिष दाखवण्यात आले त्यानंतर त्यासाठी सबस्क्रीप्शन घेण्यास भाग पाडले मात्र पैसे जमा झाल्यानंतर कंपनी अडचणीत आहे म्हणून कंपनी बंद करून टाकत आहोत असे सांगण्यात आले . आतापर्यंत 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची अंदाज आहे .