‘ आज तुमपे प्यार आया है ‘ , विधवा वहिनीला पाहून गाणं लावलं अन..

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशात समोर आलेली असून ‘ नायक नही खलनायक हु मै ‘ असे म्हणत एका दिराने चक्क त्याच्या वहिनीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. आरोपी दीर आणि त्याचा एक साथीदार यांना ताब्यात घेण्यात आलेले असून आरोपीचा साथीदार अल्पवयीन असल्याची माहिती आहे तर महिलेचा मृतदेह अद्यापही पोलिसांच्या हाती आलेला नाही.

मध्य प्रदेशातील मुरार भागात राहणाऱ्या रेणू पाठक या 17 एप्रिलपासून बेपत्ता झालेल्या होत्या त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर रेणू ह्या तिचा दीर शाम पाठक याच्यासोबत शेवटी आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. शाम हा ट्रकचालक म्हणून काम करत असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्याला काहीच माहिती नाही असा आव आणला मात्र अखेर त्याने रेणू यांच्या हत्येची त्याने कबुली दिलेली आहे. सदर प्रकरणात दोन मित्र देखील सहभागी आहेत असे देखील त्याने सांगितलेले आहे तर त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे.

आरोपीने खुनाची कबुली देताना 17 एप्रिल रोजी आम्ही ट्रक घेऊन बडागाव येथे पोहोचलो होतो. रेणू आमच्यासाठी जेवण घेऊन बडागाव येथे आलेली होती . रेणुला पाहिल्यानंतर आरोपी शाम याने गाडीमध्ये ‘ आज तुमपे प्यार आया है ‘ असे गाणे वाजवण्यास सुरुवात केली त्यानंतर रेणूदेखील ट्रकमध्ये बसली आणि त्यानंतर श्याम याने सॅड सॉंग वाजवण्यास सुरुवात केली. ग्वाल्हेर झासी हायवेवर श्याम याने ‘ नायक नही खलनायक हु मै ‘ असे गाणे वाजवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानकपणे वहिनी असलेल्या रेणु यांच्यावर वार केले असे सांगितले आहे .

त्यांचा खून झाल्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून ट्रकमध्ये ठेवला आणि त्यानंतर बेतवा नदीत फेकून दिला त्यानंतर आरोपींनी गुजरात इथे पलायन केलेले होते मात्र पोलीस आपला शोध घेत आहेत हे लक्षात आल्यानंतर घाबरून ते पुन्हा दतिया इथे दाखल झाले. आरोपीने त्याच्या वहिनीची हत्याही जादूटोणा आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याचे आतापर्यंत समोर आलेले असून पाच वर्षांपूर्वी भावाचा मृत्यू झालेला होता तेव्हापासून ही रेणू आमच्यात राहत होती. काही काळापासून माझी प्रकृती बिघडत होती त्यामुळे ती जादूटोणा करते आणि तिचे इतर कुणाचे तरी संबंध आहेत या संशयातून आपण तिला ठार मारलेले आहे अशी कबुली दिलेली आहे.