सात वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये घातली , लग्न ठरलं अन अचानक..

एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशातील इंदोर इथे समोर आलेली असून तब्बल सात वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एका जोडप्याने मंदिरात विषारी पदार्थ खाल्ला त्यामध्ये पतीचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्या प्रेयसीची देखील तब्येत गंभीर असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, दीपक अहिरवार असे मयत तरुणाचे नाव असून तो निशा नावाच्या एका तरुणीसोबत सात वर्षांपासून लिव्ह इन ररिलेशनशिपमध्ये राहत होता. लग्न कधी करणार अशी त्याला निशा सातत्याने विचारणा करायची मात्र तो टाळाटाळ करत होता. निशा अनेकदा त्याला पैशाची देखील मागणी करायची अशी माहिती समोर आलेली असून त्यानंतर पैसे देत नसल्याकारणाने निशा हिने त्याला पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात देखील पोहोचलेले होते अखेर त्याने लग्नाला होकार दिला आणि कानाडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्य समाज मंदिरात ते लग्न देखील करणार होते.

लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना अचानकपणे दोघांनीही विषारी पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर दोघेही खाली पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी दीपक अहिरवार याचा मृत्यू झालेला असून निशा हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.