अल्पवयीन नर्सच्या हत्येचे गूढ उलगडलं..तीन जणांना एकाच वेळी

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे समोर आलेले असून एका नर्सच्या हत्याप्रकरणी एका डॉक्टरसह तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत . पोलीस तपासात सदर नर्स ही तीनही आरोपी सोबत प्रेमसंबंध असल्याचे वर्तन करत होती त्यामुळे अखेर तिन्ही प्रियकरांनी एकत्र येऊन तिचा खून केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रहिमाबाद येथे 17 वर्षांची अल्पवयीन नर्स एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. 10 एप्रिल रोजी संध्याकाळी ती बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आलेला होता. पोलीस तपास सुरू असताना तिचे अमित अवस्थी नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे तपासात समोर आले.

काही दिवसांनी ही अल्पवयीन परिसरातील डॉक्टर असलेले अंकित सिंग आणि पहिला प्रियकर अमित याचा मित्र दिनेश मौर्य याच्यादेखील संपर्कात आलेली होती. तिघांना ती फोनवर बोलत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती मात्र दिनेश मौर्य याने त्याचा मित्र अमित याला माहिती दिली आणि त्यानंतर अशाच पद्धतीने ती डॉक्टर अंकित सिंग याला देखील तिने आपल्या जाळ्यात ओढलेले आहे याची तिघांनाही माहिती झाली.

डॉक्टर अंकित सिंग , अमित अवस्थी आणि दिनेश मौर्य या तिघांनी तिच्या हप्तेचा कट रचला आणि 10 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तिला अमित याने बागेत नेले. तिथे गेल्यानंतर तिचा खून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी आणले होते मात्र त्यानंतर सोडून दिले . ही आत्महत्या असल्याचा युक्तिवाद पोलीस करत होते मात्र वरिष्ठांनी खडसावल्यानंतर तपासाला सुरुवात केली त्यावेळेस हा खून असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

एक एप्रिल रोजी रात्री ही अल्पवयीन नर्स आरोपी अंकित सिंग यांच्या फ्लॅटवर थांबलेली होती त्यावेळी तिथे आणखीन दोन लोक देखील होते . अमित याने तिच्याशी संपर्क साधून तिला बोलावून घेतलेले होते. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची झडती घेतली त्यावेळी त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग , व्हाट्सअप चॅट आढळून आलेले असून त्यामध्ये वरील तीनही आरोपी हे तिच्या हत्येबद्दल बोलत आहेत असे समोर आलेले आहे . मुख्य आरोपी असलेला अमित याच्या कुटुंबीयांनी आपल्याला या प्रकरणात नाहक अडकवण्यात आलेले आहे. पोलिसांनी त्यासाठी तीन लाख रुपये घेतलेले आहेत असे म्हटलेले असून पोलीस सध्या तपास करत आहेत.


Spread the love