मराठा प्रवीण पिसाळ यांचे निधन, आमदार महेश लांडगे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट

Spread the love

मराठा समाजाच्या एकीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक प्रवीण मिसाळ यांचे अकाली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले असून त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर आपली श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे. भाजपचे पुण्यातील आमदार महेश लांडगे यांनी प्रवीण पिसाळ यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केलेले आहे.

कोरोना काळाच्या आधीपासून मराठा समाजाच्या एकत्रीकरणात तसेच समाजाचे संघटन करण्यात प्रवीण पिसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फेसबुकवर ग्रुप सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांच्या ग्रुप सदस्यांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली. महाराष्ट्रच नव्हे तर देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी मराठा समाजाला एकत्र आणण्यात त्यांच्या ग्रुपने मोठी भूमिका बजावलेली होती.

मराठा समाजातील विविध तरुणांचे व्यवसाय , त्यासाठी त्यांना योग्यवेळी लागणारी मदत , संकटकाळात अडचणीत आल्यावर मदत आणि त्यासाठी मदत करणारे लाखो हात या ग्रुपने एकमेकांना जोडलेले होते. प्रवीण पिसाळ यांनी मराठा आरक्षणासाठी देखील मोठी भूमिका बजावली होती. मराठा बांधवांच्या वतीने भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आणि कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश देखील सुपूर्द केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील देव दुःखातून सावरण्याची पिसाळ कुटुंबीयांना शक्ती देवो असे म्हटलेले आहे.


Spread the love