शिक्षिका माहेरी राहायला होती , वडिलांनी खोलीत प्रवेश केला तर..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर परिसरातील बुटीबोरी इथे समोर आलेले असून शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेली आहे . ओम साई नगर येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये ही घटना 21 तारखेला समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चेतना शिरीष भक्ते ( वय 35 ) आणि त्यांची मुलगी हर्षिका ( वय 11 ) अशी मयत मायलेकींची नावे आहेत. चेतना यांचे त्यांच्या पतीसोबत पटत नसल्याने त्या मुलीसोबत वडिलांच्या घरी राहत होत्या. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून एका शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या . शनिवारी रात्री जेवण करून झोपण्यासाठी त्या खोलीत गेल्या मात्र सकाळी उठल्या नाहीत म्हणून वडील तिथे पोहोचले आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा आतून बंद होता.

त्यांनी शेजारील भाडेकरूच्या खोलीतून मुलीच्या खोलीत प्रवेश केला त्यावेळी मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले . मुलगी आणि नात यांना अशा अवस्थेत पाहिल्यानंतर वडिलांनी जागीच टाहो फोडला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले त्यावेळी नात विष प्राशन केल्यामुळे तडफडत होती म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अखेर तिचा मृत्यू झालेला आहे . कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक चर्चा असून पोलीस पुढील तपास करत आहेत.