पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून शिक्रापूर परिसरात रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेने दौंड तालुक्यातील एका व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात अडकवले होते त्यानंतर त्याला हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न या दांपत्याला चांगलाच महागात पडलेला असून दोघेही पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुरते अडकलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , पुनम परशुराम वाबळे हिने सोशल मीडियावर तिच्या अकाउंटवर आकर्षक असे फोटो ठेवल्याने दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील एक उद्योजक तिच्या सापळ्यात अडकलेला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तिने शिक्रापूर इथे तिच्या घरी त्याला बोलावले आणि याचवेळी तिच्या पतीने तिथे दाखल होत त्यांचा व्हिडिओ बनवला आणि पैशासाठी त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली . सुरुवातीला 25 हजार रुपये त्यांनी उकळवले त्यानंतर त्याला आणखीन पाच लाख रुपये आणि एक प्लॅटची मागणी करण्यात आली त्यानंतर या उद्योजकाने पोलिसांना खबर दिली.
पूनम हिने हिची इंस्टाग्रामवर कुरकुंभ येथील उद्योजक असलेले राहुल झगडे नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झालेली होती त्यानंतर त्यांच्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर राहुल याला शिक्रापूर येथे भेटण्यासाठी बोलावले होते. शिक्रापूर येथील घरी आल्यानंतर बोलत असतानाचा व्हिडिओ पुनम हिचा पती परशुराम याने काढला आणि त्याच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करण्यात आली. आपल्या पाठीमागे झंझट नको म्हणून राहुल यांनी अखेर 25 हजार रुपये दिले मात्र तरी देखील या दांपत्याची भूक काही आटोक्यात येत नव्हती. पूनमने त्याला तू एकदा शिक्रापूरला ये सगळे मिटवून टाकू असे सांगत 23 तारखेला शिक्रापूरला त्याला बोलावून घेतलेले होते त्यावेळी प्रकरण मिटवायचे असेल तर पाच लाख रुपये दे आणि एक फ्लॅट तरी दे अशी मागणी केली.
सदर गोष्ट ही आपल्या आवाक्याबाहेरची आहे हे लक्षात आल्यानंतर अखेर राहुल झगडे यांनी पोलिसात शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली नंतर पूनम परशुराम वाबळे आणि परशुराम अंकुश वाबळे या दाम्पत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी परशुराम याला ताब्यात घेण्यात आलेले आहे तर त्याची बायको तात्काळ फरार झालेली आहे. पुढील तपास फौजदार माधुरी झेंडगे करत असल्याची माहिती आहे .