डॉक्टरांकडून तब्बल दोन वर्षे राहत्या घरात अन लॉजवर , पीडिता म्हणतेय की ?

Spread the love

डॉक्टर म्हटल्यानंतर प्रत्येक नागरिकांमध्ये या प्रोफेशनबद्दल आदर असतो मात्र काही व्यक्तींकडून या पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याचे प्रकार समोर येत असून अशीच एक ताजी घटना रायगड जिल्ह्यातील रोहा इथे समोर आलेली आहे . रोहा येथील एका डॉक्टरने नागपूर येथील एका महिला डॉक्टरशी जवळीक साधत तिच्यावर वारंवार बलात्कार केलेला असून पीडित महिलेने त्याचा त्रास असह्य होत असल्याने अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही 44 वर्षीय असून ती देखील डॉक्टर आहे. नागपूरच्या विठ्ठलनगर मानेवाडा येथील ती रहिवासी असून तिने एका मॅट्रिमोनी वेबसाईटवर लग्नासाठी नोंदणी केलेली होती याच दरम्यान तिची 48 वर्षीय डॉक्टरसोबत ओळख झाली आणि या डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर त्याच्या राहत्या घरी तसेच परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर तिच्यावर अत्याचार केले आणि अखेर तिला लग्नाला नकार दिला. 2021 पासून तर फेब्रुवारी 2023 पर्यंत सतत चालू होता.

तब्बल दोन वर्ष आपले लैंगिक शोषण केल्यानंतर अखेर आरोपीने लग्नाला नकार दिला त्यामुळे फसवणूक झाल्याची महिलेची जाणीव झाली आणि तिने रोहा पोलीसात आरोपी डॉक्टरच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे . सदर प्रकरणी उपाधीक्षक सोनाली कदम ,निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love