कोंढव्यातील ‘ तो ‘ प्रकार मुलीने समुपदेशन केंद्रात सांगितला , एकास बेड्या तर..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक संतापजनक अशी घटना कोंढवा परिसरात समोर आलेली असून मुलींच्या समुपदेशन केंद्रात एका मुलीने आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडलेली आहे . कोंढवा परिसरातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे . पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपींची धरपकड सुरू केलेले असून त्यातील एकाला अटक करण्यात आलेली आहे तर दोन जण अद्याप फरार आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मुन्ना नदाफ ( वय 20 राहणार येवलेवाडी ) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून पीडित मुलीने याप्रकरणी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे. 2018 ते 2019 च्या काळात ही मुलगी सातवीत शिक्षण घेत होती त्यावेळी मुन्ना आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिला ओढून नेऊन तिच्यावर अत्याचार केलेला होता. सदर प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे मारण्याची धमकी देखील आरोपींनी दिलेली होती मात्र शालेय मुलींच्या समुपदेशनात हा प्रकार मुलीने सांगितला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.


Spread the love