काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात नारायणगाव परिसरात एका व्यक्तीचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आलेला होता. पोलीस तपासात मदत व्यक्ती यांच्या पत्नीचे आरोपी व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आलेले आहे. आपल्या अनैतिक संबंधाला अडथळा नको म्हणून या महिलेने प्रियकर आणि त्याच्या मित्रांना मदतीला घेत हा खून केल्याची समोर माहिती समोर आलेली आहे .
उपलब्ध माहितीनुसार, साहेबराव नामदेव भूतांबरे असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांची पत्नी असलेली सविता भुतांबरे आणि तिचा प्रियकर बंटी उर्फ प्रमिल गंगाराम खरमाळे यांनी खुनाचा कट रचत अखेर साहेबराव यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेली आहे . नारायणगाव पोलिसांनी सविता भुतांबरे हिला अटक केलेली आहे.
प्रथमदर्शनी हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचे दिसून आलेले होते मात्र पोलिसांचे एक पथक प्रकरणावर लक्ष ठेवून असताना सविता हिच्या अनैतिक संबंधाचा अँगल समोर आला त्यानंतर कसून तपास केल्यावर मयत साहेबराव भूतांबरे यांची पत्नी सविता साहेबराव भुतांबरे ( वय 40 वर्ष ) हिचे एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले त्यात नवरा अडचणीचा ठरत असल्याने दोन आरोपी आणि सविता भुतांबरे यांनी कटकारस्थान करून साहेबराव यांचा खून केल्याची माहिती समोर आलेली आहे.