महाराष्ट्रात आळंदी येथे काही वारकरी बांधवांसोबत पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेले असून पोलीस आणि वारकरी बांधव यांच्या वाद झाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. वारकरी बांधवांचा समूह मोठा असल्याकारणाने जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांच्या हातात लाठ्या असल्याचे देखील दिसत असून सोशल मीडियाच्या अनेक ट्विटर हँडलवर पोलिसांनी वारकरी बांधवांवर लाठीचार्ज केल्याचा दावा केला जात आहे तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर पकडू लागली आहे .
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का…
— Hemant Ogale (@hemantogale) June 11, 2023
आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज #Pune #Alandi pic.twitter.com/weMp627Mz2
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांनी देखील ट्विटरवर या घटनेबद्दल संताप व्यक्त करताना, ‘ वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो.! जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे , ‘ असे म्हटलेले आहे.