महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना अमरावती इथे उघडकीस आली असून एका पित्याने चक्क पोटच्या मुलीवर धमकी देऊन अत्याचार केल्याची ही घटना आहे . ‘आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन’ अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला प्रकार घडला असून नराधम बापाला पोलिसांनी जेरबंद केले आहे .
उपलब्ध माहितीनुसार, ‘ 9 डिसेंबरला नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गवरील असलेल्या एका गावात एका 35 वर्षीय नराधम आरोपी वडिलाने त्याच्याच 8 वर्षीय चिमुकलीला धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्या दिवशी तिची आई कामाला गेली होती घरात कोणी नसल्याची त्याने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. आपल्याच मुलीवर अत्याचार केल्यानंतर ‘ मम्मी को बतायेंगी तो, कुये में डाल दूंगा ‘ अशी तिला धमकी सुद्धा या नराधमाने त्या बालिकेला दिली होती.
आपल्यासोबत झालेल्या या किळसवाण्या घटनेनंतर तिच्या आईजवळ पीडित चिमुकलीने सर्व प्रकार सांगितला. हे कळताच तिच्या आईने या नराधमाला जाब विचारला असा त्याने आईला देखील मारून टाकण्याची धमकी दिली . अखेर आईने या नराधम पतीविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. आरोपी नराधम हा दारूच्या आहारी गेलेला असल्याने त्याने हा प्रकार केला असून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आईने केली आहे .