अल्पवयीन मुलाने स्वतःची बायको 55 वर्षीय वृद्धाला विकली , भारतातील घटना

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू असून त्याने मोबाईल घेण्यासाठी चक्क स्वतःच्या पत्नीला 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख रुपयांना विकलेले आहे . पत्नीला विकल्यानंतर त्याने एक लाख रुपयांचा मोबाईल खरेदी केला. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने प्रेमविवाह केला होता. ओडिसा येथील हे प्रकरण असून पती अल्पवयीन असल्याचे देखील समोर आलेले आहे.

ओडिसा येथील बाळंगीर जिल्ह्यातील हे प्रकरण असून बेडपाडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना समोर आलेली आहे . आरोपी हा 17 वर्षीय असून त्याची चोवीस वर्षीय तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली होती त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि पळून जाऊन त्यांनी एकमेकांसोबत रायपूर येथे रहायला सुरू केलेले होते . वीटभट्टीचे काम करून ते संसाराचा गाडा हाकत होते मात्र पतीला महागडा मोबाईल घेण्याची हौस असल्या कारणाने त्याने कल्पनेपलीकडचा प्रकार केला.

काही दिवसांपूर्वी तो पत्नीला घेऊन राजस्थान येथे गेला आणि एका 55 वर्षीय व्यक्तीच्यासोबत त्याच्या बायकोचा एक लाख रुपयात सौदा केला . पैशाचा काही भाग त्याने पार्टी आणि दारू सोडवला तर उरलेल्या पैशात त्याने महागडा मोबाईल खरेदी केला दरम्यानच्या काळात त्याने आपली बायको दुसऱ्या कुणाबरोबर तरी पळून गेली आहे असे देखील मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले मात्र मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केलेला होता.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी सर्वप्रथम पोलिसांना त्याच्यावरच संशय आला म्हणून त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला त्यावेळी काही कॉल डिटेल्स संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने राजस्थान इथे धाव घेतली आणि 55 वर्षे व्यक्तीच्या ताब्यातून या तरुणीची सुटका केलेली आहे . सदर आरोपी हा अल्पवयीन असल्याकारणाने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलेले असून त्याने आपण साठ हजार रुपये समोरच्या व्यक्तीकडून उसने घेतलेले होते ते परत करण्यात अपयश आले म्हणून आपण हा प्रकार केला असे सांगितलेले आहे.


Spread the love