महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यात जेजुरीत समोर आलेले असून जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेले महबूब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात महबूब पानसरे यांचा मृत्यू झालेला असून मयत महबूब पानसरे हे राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे यांचे जवळचे कार्यकर्ते होते.
उपलब्ध माहितीनुसार, महबूब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला त्यात ते गंभीररित्या जखमी झाले त्यानंतर त्यांना पुणे इथे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
महबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. ते आणि वणेश परदेशी यांच्यात जमिनीबाबत जुना वाद सुरू होता. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी महबूब पानसरे गेलेले होते त्यावेळी त्यांच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करण्यात आले त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी , किरण वणेश परदेशी , स्वामी वणेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.