पुण्यात प्राचार्याला मारहाण , बजरंग दलाचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये घुसले अन..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून तळेगाव परिसरातील आंबी इथे एका नामांकित शाळेच्या प्राचार्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. सदर शाळेत ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हटली जात असल्याचा आरोप करत हा प्रकार करण्यात आलेला असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केलेला आहे. सुमारे 100 जणांच्या जमावाने ही मारहाण केलेली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्राचार्य म्हणून काम करणारे अलेक्झांडर रीड असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हटली जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. घटनेमध्ये त्यांचा शर्ट फाटला गेलेला असून त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.

मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार प्राचार्यांनी विद्यार्थिनींच्या स्वच्छताग्रहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. सदर प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा हा नव्याने आरोप करत प्राचार्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. कायद्याने जे काही होईल ते होईल मात्र प्राचार्यांना अशा पद्धतीने मारहाण करणे कितपत योग्य आहे ?. ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हटली जात असल्याचा आरोप करून उद्या कुणीही कुणाला मारहाण करू शकते त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या या व्यक्तींवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Spread the love