शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये युट्युब फ्रॉड इंस्टाग्राम फ्रॉड त्यानंतर आता व्हाट्सअप फ्रॉड सुरू झालेला आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनियरला व्हाट्सअपवर मेसेज पाठवून पार्ट टाइम काम करून दिवसाला दीडशे ते आठ हजार रुपये कमवा असे आमिष दाखवत गुगल मॅपमध्ये लोकेशन पाठवून रिव्ह्यू देण्यास सांगून तीस लाख 35 हजार रुपयांची एका सॉफ्टवेअर इंजिनियरची फसवणूक करण्यात आलेली आहे. वाकड येथील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विनय विजय अग्रवाल ( वय 35 वर्ष राहणार कस्पटे वस्ती वाकड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून बुधवारी त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिसात फिर्याद दिलेली आहे . फिर्यादीमध्ये टेलिग्राम आयडी धारक , बँक खातेधारक आणि मोबाईल खातेधारक अशा एकूण 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढलेला पहायला मिळत आहे.
फिर्यादी व्यक्तीला अनोळखी व्यक्तीने मेसेज करून पार्ट टाइम काम करून दिवसाला दीडशे ते आठ हजार रुपये कमवू शकता असे या मेसेजमध्ये म्हटलेले होते त्यानंतर गुगलला रिव्ह्यू देऊन तुम्ही पैसे मिळू शकता . जितके जास्त रिव्ह्यू तुम्ही द्याल तितका तुम्हाला फायदा होईल असे दाखवत फिर्यादी व्यक्तीला एका टेलिग्राम चैनलमध्ये जॉईन करून घेण्यात आलेले होते आणि त्यानंतर वेगवेगळी कारणे देत फिर्यादी व्यक्तीकडून आत्तापर्यंत तब्बल तीस लाख 35 हजार रुपये आरोपींनी उकळलेले आहेत. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी याप्रकरणी पोलिसात धाव घेतलेली असून 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.