महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. एका वीस वर्षीय विवाहित तरुणीवर आरोपीने अत्याचार केलेला असून सातत्याने तो तिला फोन करत होता त्यामुळे या आधीच तिचा संसार मोडलेला आहे यानंतर ती घरी एकटी असल्याचे हेरले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.
उपलब्ध माहितीनुसार , महेश आजिनाथ राख असे या तरुणाचे नाव असून सातत्याने तो तिला तू मला खूप आवडते असे म्हणत तिला फोन करत होता त्यामुळे सदर विवाहित महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पतीने अखेर तिला माहेरी आणून सोडले. तरुणीचे जिथे माहेर होते त्याच गावामध्ये आरोपी महेश हा राहत होता.
माहेरी आल्यानंतर त्याने सातत्याने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि एके दिवशी ती घरी एकटी असताना तो घरात घुसला आणि त्याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर त्याने सदर प्रकार कुणाला न सांगण्याची देखील वेळोवेळी धमकी दिली मात्र अखेर त्याच्या धमकीला भीक न घालता पीडित तरुणीने पोलिसात दाखल होत त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे .