अल्पवयीन मुलाला कबुतराची विष्ठा खायला लावली , पुण्यातील संतापजनक घटना

Spread the love

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून कबूतर घेतल्याच्या वादातून एका गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले आणि पुण्यातील कात्रजमधील संतोषी माता मंदिराच्या मागील बाजूला नेऊन त्याला चक्क कबुतराची विष्ठा खायला लावलेली आहे. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलाचे वडील संतोषनगर भागात राहतात. सराईत गुन्हेगार असलेला अमोल आडम याच्यावर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला असून 25 तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आरोपी व्यक्तीने काही कबुतरे पाळलेली आहेत त्यातील एक कबूतर फिर्यादींच्या बारा वर्षांच्या मुलाने आणलेले होते त्यामुळे आरोपी अमोल आडम हा त्याच्या साथीदारांसह संतोषनगर येथे आला आणि हवेत हत्यारे फिरवत जर कोणीमध्ये आले तर एकेकाला तोडून टाकेल असे म्हणत दहशत निर्माण केली.

फिर्यादी यांच्या बारा वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपींनी त्याला दुचाकीवर बसवून कात्रज मधील साई अपार्टमेंट मध्ये नेले आणि तिथे कबुतराची विष्ठा खायला लावली. आरोपींनी त्यानंतर जर हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि आमचे घर कोणी पोलिसांना दाखवले तर तुम्हाला कुणालाही जिवंत ठेवणार नाही अशी देखील परिसरात धमकी दिली आणि त्यानंतर साई मंदिराजवळ त्याला सोडून दिले . रडत रडत मुलगा घरी आला आणि त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेले आहे .


Spread the love