शिक्षणासाठी नाशिकवरून पुणे गाठलं पण.. , फर्ग्युसन कॉलेजचा होता विद्यार्थी

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा घरापासून लांब राहिल्यानंतर तसेच आर्थिक कारणांनी आणि भविष्याच्या चिंतेने विद्यार्थी नैराश्यात जातात आणि आयुष्याचा शेवट करतात असाच प्रकार पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने केलेला असून बीएससीमधील तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेतलेला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ओम कापडणे ( वय वीस वर्ष ) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने वडारवाडी येथील विष्णूकुंज वसतीगृहात गुरुवारी गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. मूळचा तो नाशिक जिल्ह्यातील असून पुण्यात शिक्षणासाठी आलेला होता. ओम याने ज्या ठिकाणी गळफास घेतला तिथे घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट किंवा कुठले पत्र आढळून आले नाही. त्याने हा प्रकार का केला हे देखील अद्यापपर्यंत समोर आलेले नसून घटनेमागील कारण काय आहे याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.


Spread the love