गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा वापर करण्याचे महिला आणि मुली यांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून यातूनच एक धक्कादायक अशी घटना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात समोर आलेली आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून महिलेच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत फोटो काढून हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिला गरोदर असताना देखील तिचा गर्भपात करण्यात आला याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल संभाजी झगडे ( राहणार झगडेवाडी कुरकुंभ तालुका दौंड ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची आणि पीडित महिलेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेली होती. दोघे एकमेकांशी बोलत असताना महिलेच्या वाढदिवसाच्या दिवशी तो केक घेऊन महिलेच्या घरी आला त्यानंतर महिलेसोबत फोटो काढले . हे फोटो त्या महिलेच्या पतीला दाखवण्याची धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे देखील पुन्हा फोटो काढले . वारंवार तो अशा पद्धतीने फोटो काढून तिच्यावर सातत्याने अत्याचार करू लागला.
दरम्यानच्या काळात महिलेचे पतीसोबत देखील वाद सुरू झाले म्हणून त्याने अखेर पतीला तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊन टाक असे देखील म्हणू लागला . काही कालावधी गेल्यानंतर महिलेच्या पोटात त्रास जाणू लागला म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले म्हणून आरोपी राहुल याने तिला वेगवेगळ्या गोळ्या खायला दिल्या आणि तिचा गर्भपात देखील घडवून आणला. आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून अखेर तीने शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.