पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून ‘ तुझ्यामुळे माझी आई आज हॉस्पिटलला ऍडमिट झालेली आहे ‘ असे म्हणत ननंदेने चक्क वहिनीचा चावा घेत तिला शिवीगाळ आणि मारहाण केलेली आहे. आरोपी ननंद हिने केलेल्या हल्ल्यामध्ये वहिनीच्या हाताला पायाला आणि कानाला इजा झालेली असून जखमी झालेल्या वहिनीने त्यानंतर पोलिसात दाखल होत तक्रार नोंदवलेली आहे. शनिवारी 29 तारखेला दुपारी बाराच्या सुमारास चिखली परिसरात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादीच्या घरी येऊन आरोपी ननंद हिने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर आज तुझ्यामुळे माझी आई हॉस्पिटलला ऍडमिट झालेली आहे असे सांगितले त्यानंतर फिर्यादी व्यक्ती ननंद हिला समजावून सांगत असताना आरोपी नणंदेने तिच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर तिच्या दोन्ही हाताला , उजव्या पायाला आणि डाव्या कानाला चावा घेऊन जखमी केले , असे फिर्यादीत म्हटलेले आहे .