सोशल मीडियावर सध्या एका तरुणीची जोरदार चर्चा सुरू असून ही तरुणी अस्तित्वात आहे की नाही यावर देखील चर्चा सुरू आहे . भोपाळ येथील हे प्रकरण असून भोपाळमधील अंकिता नावाच्या एका मुलीने तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरीवरून जेवण ऑर्डर केले साहजिकच तिने पैसे दिले नाही त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी म्हणून झोमॅटोच्या बॉय दरवाजावर पोहोचला मात्र तरुणांनी अनेकदा नकार दिला शेवटी झोमॅटो कंपनीने ट्विट करून अंकिताला सल्ला दिलेला आहे.
झोमॅटोच्या या ट्वीटने सोशल मीडियात एक खळबळ उडून दिलेली असून भोपाळच्या अंकिताला आवाहन करत ट्विटमध्ये मध्ये ,’ भोपाळची अंकिता आता बस करा. तुमच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी कॅश ऑन डिलिव्हरीवर जेवण ऑर्डर करणे थांबवा. तुमच्या एक्सने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्याची ही तिसरी वेळ आहे ‘, झोमॅटो कंपनीचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
झोमॅटो कंपनीला खरोखरच कुणी अंकिता नावाच्या तरुणीने त्रास दिलेला आहे का ? यावर देखील अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून इंटरनेटवर ट्विट व्हायरल व्हावे म्हणून तर झोमॅटो हा प्रकार केलेला नाही केलेला आहे का ? असा देखील प्रश्न काही जणांनी उपस्थित केलेला आहे मात्र ही अनोखी पद्धत बऱ्याच जणांना आवडलेली असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे.