महाराष्ट्र हादरला..पत्नीवर कोयत्याने वार केले अन त्यानंतर मुलालाही..

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना रत्नागिरी जिल्ह्यात समोर आलेली असून लांजा तालुक्यात एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाची अमानुषपणे हत्या केलेली आहे. गुरुवारी ही घटना समोर आलेली असून आरोपी वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , संदेश रघुनाथ चांदिवडे असे याप्रकरणी मुख्य संशयित व्यक्तीचे नाव असून लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथील तो रहिवासी आहे. संदेश याने त्याची पत्नी सोनाली ( वय 26 ) हिची कोयत्याने वार करून हत्या केली आणि त्यानंतर प्रणव नावाच्या स्वतःच्या मुलाचा देखील त्याने गळा आवळला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तात्काळ तीन पथकांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केलेला होता.

घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून आरोपी हा वीज बिलाच्या मीटरची रिडींग घेण्याचे काम करत असायचा. पत्नी आणि मुलाला ठार मारून तो फरार झालेला होता मात्र एका घराच्या पाठीमागे तो लपून बसलेला असताना पोलिसांनी अखेर त्याला ताब्यात घेतलेले आहे. हत्या नेमकी कुठल्या कारणामुळे झाली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.


Spread the love