कॉलेजला कार्यक्रम आहे म्हणून बाहेर पडली अन.., पुण्यातील दुर्दैवी घटना

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना खेड तालुक्यात समोर आलेली असून चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. खेड तालुक्यात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड ( वय 24 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून चार तारखेला सकाळी सहाच्या सुमारास राजगुरुनगर येथील महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडलेली होती मात्र ती घरी आली नाही म्हणून तिचा शोध सुरू असताना काळेवाडी रस्त्याजवळ असलेल्या चासकमान कालव्याच्या मागील बाजूला वाहत्या पाण्यात तिचा मृतदेह आढळून आलेला होता.

तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला .तिच्या अशा जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. सोनाली अभ्यासात हुशार होती मात्र तिने हा प्रकार का केला किंवा ती पाय घसरून पाण्यात पडली याचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love