‘ आळंदीमध्ये तुम्ही कधी आलात तर आळंदी आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. पहिल्यांदा महाराज लोकांना चोरासारखं राहावं लागत होतं मात्र आता आम्ही आळंदीत सगळ्यांचे बाप आहोत. आळंदीत काहीही मॅटर घडू द्या तो मला कळू द्या जर तुमचा मॅटर सोडवला नाही तर मी कीर्तन करायचे सोडून देईल. मी बिघडलो की खूप हाणतोय. पोलीस स्टेशनचा मॅटर असू द्या. दवाखान्याचे काही असू द्या मी ते फक्त दहा मिनिटात रफादफा करतो ‘, असे धक्कादायक वक्तव्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पाटील यांनी एका कीर्तनात बोलताना केलेले आहे.
ह भ प असलेल्या महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी त्यांच्याविषयी संताप व्यक्त केलेला असून अखेर लक्ष्मण पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल आणखीन एक व्हिडिओ जारी करून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. वारकरी संप्रदायात अशी भाषा महाराज लोकांना शोभत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलेला होता. लक्ष्मण महाराज पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर जाहीर माफी मागावी अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली होती.