महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून एका व्यक्तीला तरुणीसह तिच्या घरच्यांनी घरात बोलावत चांगलेच लुटले आहे . ‘अंकल अंदर आओ… ‘ असे म्हणत या व्यक्तीला घरात बोलावले मात्र त्यानंतर चांगलाच मार देत त्याच्याकडून या तरुणीसोबत संबंध असल्याचा व्हिडीओ देखील बनवला आणि हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळले. धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व्यक्ती ४६ वर्षीय असून सेंट्रल रेल्वेत कार्यरत आहेत.
पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे आधी धारावीतील नित्यानंद चाळीत रहात होते त्यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका तरुणीसह तिच्या घरच्यांशी देखील चांगले संबंध होते. गेल्यावर्षी त्यांनी दुसरीकडे राहण्यास जात असल्याने शेजारच्या तरुणीला मोबाईल विकत घेण्यास गरज असल्याने थोडी पैशाची मदत देखील केली होती. सदर तरुणीने त्यापैकी ९ हजार रुपये दिले होते तर चार हजार रुपये येणे बाकी होते .
२९ जानेवारी रोजी तरुणीने कॉल करून सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घरी येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तक्रारदार तिथे पोचले असताना दरवाजातच उभ्या असलेल्या तरुणीने ‘अंकल अंदर आओ’ असे बोलून घरात नेले. तक्रारदार घरात जाताच तरुणीने बरेच नातेवाईक आधी बोलावून ठेवले होते . त्यावेळी एकाने दरवाजा बंद केला आणि लाथाबुक्क्यांसह हातात मिळेल त्या वस्तूने तक्रारदारांना मारहाण केली. तरुणीसोबत संबंध असल्याचे त्यांना कबुल करण्यास सांगत एकाने व्हिडीओ बनविला आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी १० लाखांची मागणी केली.
सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी तक्रारदार यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपये उकळले आहेत आणि अद्याप देखील ते पैशाची मागणी करत असल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलीस ठाणे गाठत त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार हे गेल्या महिन्यात रेल्वे वसाहतीत राहण्यास गेले मात्र अखेर धाडस करून पोलिसांत धाव घेत त्यांनी तक्रार दिली असून तपास सुरु आहे .