महाराष्ट्रात एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून रायगड येथील ही घटना आहे. जादूटोण्याच्या मदतीने चक्क पैशाचा पाऊस पाडणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई गावातील हा प्रकार आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहून आरोपींना पकडून देण्यास पोलिसांना मदत केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , धामणसई गावातील शाळेत पैशाचा पाऊस पडणार असे आमिष दाखवत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने शाळेत फुले , अबीर ,गुलाल बिबवा ,लिंबू टाचण्या ,काळी बाहुली अशा काळ्या जादूसाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू जमा केलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी याच्या मदतीने स्मशानात जाऊन अघोरी पूजा केली आणि त्यानंतर गावातील मारुती मंदिरात जाऊन नारळही फोडलेला होता.
बराच काळ हा प्रकार काय सुरू आहे हे ग्रामस्थांच्या देखील लक्षात आले नाही मात्र काळ्या बाहुल्या आणि बिबवे पाहिल्यानंतर या प्रकाराचा अंदाज ग्रामस्थांना आला आणि त्यांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सहा जणांच्या टोळक्याला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी कोण आहे आणि ही पूजा कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येत होती याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.