पुणे स्टेशनवरचा ‘ तोतया ‘ चक्क 15 ऑगस्टच्या समारंभाला उपस्थित

Spread the love

पुणे शहरात एक अजब घटना समोर आलेली असून एका तोतया रेल्वे अधिकाऱ्याला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यानंतर हा अधिकारी चक्क 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या विशेष समारंभाला देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आलेली आहे. गुप्तचर विभागाकडून या अधिकाऱ्याची सध्या चौकशी सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नीरज विक्रम विश्वकर्मा ( वय वीस वर्ष राहणार लठेरा इटावा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश ) असे तोतया अधिकाऱ्याचे नाव असून पुणे रेल्वे स्टेशनवर तो संशयास्पदरित्या फिरत असताना त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि त्यानंतर फलाट क्रमांक सहाजवळ त्याला ताब्यात घेण्यात आलेले होते. विश्वकर्माला ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर गुप्तचर विभागाचे अधिकारी देखील पुणे स्टेशनवर दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे कुठलेही शासकीय पद असल्याचे आढळून आले नाही. त्याने लेफ्टनंट दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घातलेला होता सोबतच त्याच्या जवळ छोटी नेमप्लेट देखील आढळून आली. विशेष म्हणजे त्याने 15 ऑगस्टच्या दिवशी हाच गणवेश परिधान करून लाल किल्ल्यात काही लष्करी अधिकाऱ्यांसोबत फोटो देखील काढलेले आहेत. देशात तो कुठे कुठे फिरलेला आहे आणि यामागील त्याचा हेतू काय आहे याचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love