नागपूर हादरले..मुलीच्या रूममध्ये मध्यरात्री ‘ कुजबुज ‘ ऐकताच आईने दरवाजा लोटला अन…

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली असून आई वडील झोपी गेलेले असताना चक्क एका अल्पवयीन मुलीने प्रियकराला रात्री घरात बोलवले . त्यांच्यात ‘ नको ते ‘ सुरु असताना अचानक मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला आणि आईने तिला आणि तिच्या प्रियकराला चांगलीच मारहाण केली आणि त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सूरज ब्रह्मानंद लहाने (वय २७, बंगाली पंजा, लेंडी तलाव) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ३८ वर्षीय महिला परिचारिका ही तिचा पती व १७ वर्षीय मुलीसह पाचपावली परिसरात राहते. मुलगी रिया (बदललेले नाव) सध्या अकरावी इयत्तेत शिकत असून अभ्यासात हुशार असल्याने आईने तिला महागडी फी भरून ट्युशन क्लास लावले. ऑनलाइन क्लास होत असल्यामुळे तिला महागडा मोबाईल देखील घेऊन दिला मात्र रियाने अभ्यास सुरु असतानाच इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले आणि तिचे व्हिडीओ टाकणे सुरु केले. आईवडिलांना या प्रकाराची कल्पनाच नव्हती .

आरोपी सूरज हा फर्निचरचा कारागीर असून ऑर्डरनुसार घरोघरी काम करतो. त्याने रियाला इंस्टावर रिक्वेस्ट पाठविली आणि दोघांचे एकमेकांना रोज मॅसेज सुरू झाले. रियाला त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकविले त्यामुळे ती ऑनलाइन क्लास सोडून सूरजशी चॅटिंग करण्यातच जास्त वेळ घालवत होती. त्यानंतर सुरज याने तिला एकदा फुटाळ्यावर भेटायला बोलावले आणि त्यानंतर तेथून हॉटेलवर नेऊन प्रोपोज देखील केले. ती हो म्हटल्यावर सुरज याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली.

रिया हिने त्याला तिच्या बेडरूममध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता येण्यास सांगितले. सुरज ठरलेल्या वेळी आला आणि रिया हिने आईवडिलांच्या नकळत त्याला घरात घेतले. रात्री एक वाजता रियाची आई लघुशंकेला गेली असताना मुलीच्या बेडरूममधून कुजबुज कानी आली म्हणून तिने दरवाजा उघडला असताना तिला मुलगी ‘नको त्या ‘ अवस्थेत दिसल्याने तिने डोके भडकले आणि तिने सूरजच्या कानशिलात वाजवली आणि पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली. आरोपी सुरज याला अटक करण्यात आलेली आहे.


Spread the love