देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरात समोर आलेले असून चित्रकूट जंगलात अपहरण करण्यात आलेल्या एका व्यापाऱ्याच्या मुलाची अखेर हत्या करण्यात आलेली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन्ही अपहरणकर्ते गोळ्या लागून जखमी झालेले आहेत. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दोन्ही आरोपींनी प्रयागराज मधील शंकरगड येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केलेले होते आणि त्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. जर खंडणी दिली नाही तर मुलाची हत्या करू अशी देखील धमकी आरोपींनी दिलेली होती त्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
पुष्पराज केसर्वांनी उर्फ विकी असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा 14 वर्षाचा मुलगा शुभ याचे आरोपींनी अपहरण केलेले होते . सुखदेव ( राहणार चित्रकूट ) आणि संजय वर्मा ( राहणार शिवपुर पानवारी रेवा ) अशी आरोपींची नावे असून पोलिसांच्या गोळ्या लागल्यानंतर ते देखील जखमी झालेले आहेत. दोन्ही आरोपींनी शनिवारी रात्री शुभ याला ससा दाखवण्याच्या पाहण्याने पळवून नेलेले होते.
शुभ आपल्या हातात आला आहे हे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि त्याच्या बदल्यात 15 लाख रुपयांची खंडणी मागितली . प्रकरण पोलिसात गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी शुभ याची अमानुषपणे हत्या केलेली आहे. सुखदेवचा मामा गणेश चंद्र याला देखील अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून शस्त्र आणि नंबर नसलेली एक दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे.