पुण्यातील वैशाली हॉटेलचा वाद पुन्हा चिघळला , बँकेच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा

Spread the love

गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या वैशाली हॉटेलचा वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याच वादातून आता एक नवीन प्रकरण सध्या समोर आलेले असून वैशाली हॉटेलची मालकीण यांची बनावट सही करून तब्बल पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे. वैशाली हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी या प्रकरणी पतीसोबत बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , निकिता यांनी डेक्कन पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली असून त्यांचा पती विश्वजीत विनायक जाधव ( वय 41 वर्ष ) याच्यासोबत कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद चौधरी , डीएसएआरआर फायनान्सचे अधिकारी रवी परदेशी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात हॉटेल वैशालीच्या मालकीवरून वाद अत्यंत टोकाला पोहोचलेले असून दोघांनीही परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल केलेल्या आहेत . निकिता यांना विश्वासात न घेता पती विश्वजीत याने यांनी बँक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निकिता यांची बनावट स्वाक्षरी करत कागदपत्रे बनवली असा आरोप विश्वजीत यांच्यावर आहे.

निकिता यांच्या म्हणण्यानुसार आपल्या परवानगीशिवाय सदनिका त्यांनी बँकेकडे गहाण ठेवली आणि तब्बल चार कोटी 97 लाख रुपयांचे कर्ज काढून घेतले . डेक्कन पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संबंधित गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे .


Spread the love