फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून एका महिलेकडील चुरगळलेल्या नोटा सरळ करून देतो असे म्हणत हातचलाखी दाखवत 19 हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार देहूरोड इथे समोर आलेला आहे. देहू फाटा येथील एका बँकेत सहा तारखेला शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली असून देहूरोड पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला बँकेत मशीनद्वारे पैसे भरण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडील काही नोटा चुरगळलेल्या असल्याने मशीन त्या नोटा स्वीकारत नव्हते म्हणून शेजारी असलेला एक अनोखा व्यक्ती याने त्यांना नोटा सरळ करून देतो असे म्हणत 48 हजार रुपयांच्या नोटा घेतल्या मात्र हातचलाखी करत त्यानंतर त्यातील 19 हजार रुपये काढून घेतले . प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले आणि महिलेने पोलिसात धाव घेतली.