मुळशीत ‘ नको ते ‘ घडलं , सातव्या मजल्यावर असताना अचानक..

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना मुळशी तालुक्याच्या पिरंगुट इथे समोर आलेली असून सातव्या मजल्यावरून पडल्यानंतर एका व्यक्तीचा अखेर मृत्यू झालेला आहे . सोमवारी नऊ तारखेला सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मुळशी तालुक्याच्या पिरंगुट मधील अर्बन ग्राम या गृहनिर्माण सोसायटीतील सातव्या मजल्यावरून अमित महालिंग आवळे ( वय 37 वर्ष राहणार पिरंगुट मुळशी ) हे घसरून पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला . मूळचे ते लातूर जिल्ह्यातील असून सद्य परिस्थितीत मुळशीमध्ये वर्तमानपत्र विकण्याचा व्यवसाय करत होते.

अमित आवळे यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा दहा वर्षाचा मुलगा रोज त्यांना सकाळी पेपर टाकण्यासाठी मदत करत असायचा . आर्थिक परिस्थिती या कुटुंबाची हलाखीची असून सोशल मीडियावर कुटुंबाच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे .


Spread the love