पुण्यात बुधवार पेठेत मोठी कारवाई , बांगलादेशी महिला आल्या अन..

Spread the love

पुणे शहरातील बुधवार पेठ ही संपूर्ण राज्यभरात बदनाम झालेली आहे. अनेक महिलांना इथे आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येते असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला असून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत कारवाई करत सात बांगलादेशी महिलांना अटक केलेली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सामाजिक सुरक्षा पथकाला गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पुण्यातील बुधवार पेठ इथे काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर तात्काळ कारवाई करत सात बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली असून गेल्या चार वर्षांपासून त्या पुण्यात बेकायदा वास्तव्य करत होत्या.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यांच्याकडे रहिवासी असल्याबाबतची कुठलीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवलदार इरफान पठाण यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिलेली असून महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . बुधवार पेठ येथे अनेक बांगलादेशी महिला अवैध पद्धतीने येऊन वेश्याव्यवसाय करत असल्या कारणाने पुणे शहराची देखील यामुळे बदनामी होत आहे.


Spread the love