अखेर ‘ त्या ‘ तरुणाची ओळख पटली , खडकवासला धरणाजवळ होता मृतदेह

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून कौटुंबिक वादातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केलेली आहे . मयत व्यक्ती हा पेंटर काम करायचा आणि त्याला दारूचे व्यसन होते . कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला म्हणून त्याने घर सोडले आणि त्यानंतर हा प्रकार केला.

उपलब्ध माहितीनुसार , स्वप्निल रामभाऊ कणसे ( वय 34 राहणार सिद्धी हाइट्स शिवणे मूळ राहणार सावरगाव जिल्हा बीड ) असे मयत तरुणाचे नाव असून खडकवासला धरणातील मोरीजवळ एका तरुणाचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तरंगताना पाहिलेला होता. पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर हवेली पोलीस ठाण्यातील हवालदार निलेश राणे , विलास प्रधान , दिनेश कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तम नगर पोलिसात त्याच्या आईने तो बेपत्ता असल्या प्रकरणी फिर्याद दिलेली होती.


Spread the love