पुण्यात एक अजब प्रकार समोर आलेला असून पेन्शनर असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कॉल गर्लला भेटण्याची इच्छा झाली आणि त्यानंतर जवळ पैसा असल्याकारणाने त्यांना तशा स्वरूपाची तरुणी देखील भेटली मात्र त्यानंतर जो काही अनुभव आला तो मात्र भयावह होता.
उपलब्ध माहितीनुसार , पुण्यातील ज्येष्ठ नागरिक असलेल्या एका 74 वर्षीय व्यक्तीला कॉल गर्ल हवी आहे अशा स्वरूपाची इच्छा व्यक्त झाल्यानंतर त्याने इकडून तिकडून शोध लावत ज्योती नावाच्या एका महिलेमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली. ज्योती हिने त्यानंतर या नागरिकाला फोन करून कॉल गर्लला पोलिसांनी अटक केलेली आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात तिला अटक केलेली असून तिच्या फोनमध्ये तुमच्या कॉलची डिटेल्स आहेत त्यामुळे पोलीस देखील तुमचे नाव त्यात घालतील अशी भीती फिर्यादी यांना घालण्यात आली.
आरोपी महिला ज्योती हिने त्यानंतर फिर्यादी यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चेकच्या माध्यमातून तब्बल ३० लाख ३० हजार रुपये घेतले . सदर प्रकरणी पोलिसांनी ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीकडून फिर्यादी यांच्याकडून तीस लाख रुपये लुटल्यानंतर देखील दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची मागणी त्यांना करण्यात आली होती. पोलीस कारवाई करतील अशी भीती दाखवत आरोपींनी त्यांना सतत त्रास देण्यास सुरू केले.
तीस लाख गेल्यानंतर देखील फिर्यादी काही काळ शांत होते मात्र दर महिन्याला पैसे द्यायचे हे त्यांच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असल्या कारणाने त्यांनी अनेकदा आरोपींना या संदर्भात प्रकरण मिटून टाकण्याची विनंती केली मात्र कितीही प्रयत्न केले तरी आरोपींची पैशाची हाव भागत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे .