महाराष्ट्रात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा एन्काऊंटर कधीही होऊ शकतो असे भीती पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलेली असून एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डीनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही यामध्ये राजकीय व्यक्तींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळकाढूपणा करत आहेत , असा घणाघाती आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी या प्रकरणी आरोप केलेला असून धंगेकर म्हणाले की , ‘ ललित पाटील कसा पळाला हे सगळ्यांनीच पाहिलेले आहे. ससूनमधील डीनदेखील काही बोलत नाहीत. कुणीच काही कारवाई करत नाही पोलीस फक्त ललित पाटील यांच्या संपत्तीची मोजताद करत आहेत या पलीकडे काहीच काम करत नाहीत .
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की , ‘ सदर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते असल्याचे दिसून येत असून आजी-माजी पोलीस अधिकारी देखील यात सहभागी असण्याची शक्यता आहे. ललित पाटील आपले नाव घेईल या भीतीने कदाचित त्याचा एन्काऊंटर कधीही होऊ शकतो अशी भीती आहे ‘, असे म्हटलेले आहे .