लहान मुलांना बाहेर उभं ठेऊन आईचा कारमध्ये रोमान्स आला होता रंगात मात्र अचानक..

Spread the love

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम राहिलेला नाही . अशाच एका घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सदर घटने विषयी सोशल मीडियात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या दोन मुलांना कारबाहेर उभं ठेऊन एक आई कारमध्ये तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत असलेल्या अर्जेटिंनातील प्लाटा येथील पेरेयरा इराओला पार्कमध्ये कामक्रीडेत मग्न झालेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , अर्जेटिंनात घडलेल्या या घटनेत ही महिला आपल्या प्रियकरासोबत चक्क कारमध्ये ‘ नको तो ‘ प्रकार करत असताना तिने आपल्या दोन्ही अपत्यांना कारच्या बाहेर उभं केलं आणि त्यानंतर कारचे दरवाजे बंद करून महिला तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करू लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ५ वर्षांची मुलगी तिच्या २ वर्षांच्या भावासोबत कारच्या बाहेर दिसत आहे. दोन्ही मुलं कारमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होती मात्र महिलेला याचे काही घेणे देणे नव्हते .

व्हिडिओमध्ये दिसून आले की दोन्ही मूल कारमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत त्यांना आईसोबत आत बसण्यासाठी विनंती करत होती मात्र कामक्रीडेत मग्न असलेल्या या महिलेनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मुलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने कारचा दरवाजा आतून बंद केलेला होता. तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने या घटनेची पोलिसांना खबर दिली . पोलिसांनी तिथे पोहचत कारमधील महिलेला तिच्या प्रियकरासोबत अटक केली आहे

कारमध्ये महिलेसोबत असलेला पुरुष हा त्या महिलेचा पती नव्हता हा धक्कादायक प्रकार पोलिसाच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम दोन्ही मुलांना केअर सेंटरमध्ये ठेवले आणि तिच्या पतीला ह्या प्रकारची कल्पना दिली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे .


Spread the love