देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल झालेली आहे . एका चाळीस वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचे हत्या करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडलेली असून मयत महिला ही अनुसूचित जातीतून येते. तिची हत्या करण्यात आली आणि तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आले. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना आरोपीची संख्या तीन असून त्यांना पकडण्यासाठी सुरुवात केलेली आहे असे म्हटलेले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील याबद्दल ट्विट केलेले आहे.
सदर महिला ही पिठाच्या गिरणीवर तसेच भिंती लिंपण्याचे काम करायची. राजकुमार शुक्ला आणि त्याचा भाऊ बाउआ शुक्ला या दोघांनी महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. आईच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची मुलगी तिथे पोहोचली त्यावेळी गिरणीमध्ये तिच्या आईचा मृतदेह तिला दिसून आला. तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आलेले होते. पोलिसांनी त्यानंतर राजकुमार शुक्ला त्याचा भाऊ बाउआ शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला यांच्या विरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केलेला असून घटनेच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.