महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार पुण्यात समोर आलेला असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
सदर प्रकार हा कोथरूड येथील एका कोचिंग क्लासच्या बिल्डिंगमध्ये घडलेला असून तीन तारखेला संध्याकाळची ही घटना आहे. 16 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तक्रारदार मुलगी ही कोथरूड येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी जात असून शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंग मधून ती लिफ्टने क्लासमध्ये जात होती त्यावेळी लिफ्टमध्ये एक अनोळखी व्यक्ती होता. त्याने लिफ्टवर जात असताना मोबाईलमध्ये मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला त्यामुळे मुलगी घाबरून गेली तात्काळ तिने पोलिसात दाखल होतबी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.