डॉलर धुण्यासाठी ऍसिड पाठवतो , पुण्यात आजीबाई जोडीदार शोधत होत्या अन..

Spread the love

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून विवाहविषयक एका वेबसाईटवर मैत्री झाल्यानंतर डॉलर पाठवतो तसेच ते धुण्यासाठी ऍसिड देखील पाठवतो असे सांगून एका निवृत्त बँक मॅनेजरला नऊ लाख 93 हजार रुपयांना गंडवण्यात आलेले आहे. तक्रारदार महिला यांचे वय 60 वर्ष असून त्या पुण्यातील केशवनगर परिसरात राहतात.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार महिला यांची मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून थॉमस मॅथ्यू नावाच्या एका व्यक्तीसोबत ओळख झालेली होती त्यावेळी त्याने फिर्यादी यांना माझ्याकडे असलेले एक लाख 29 हजार डॉलर मी तुमच्या घरी पाठवतो असे म्हणून घरचा पत्ता घेतलेला होता.

आरोपीने त्यानंतर व्हिसा चार्जेस , कुरिअर पॅकेज , डिपॉझिटची रक्कम तसेच डॉलर धुण्यासाठी ऍसिड असे सांगत फिर्यादी महिला यांच्याकडून नऊ लाख 93 हजार रुपये उकळले असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. वयाच्या साठाव्या वर्षी ही फसवणूक झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आलेलो आहोत असे देखील फिर्यादी यांचे म्हणणे आहे.


Spread the love