महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात समोर आलेली होती एका अल्पवयीन मुलीला देवदर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिच्यावर तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता. सदर प्रकरणी बारामती येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , बाळू श्रीमंत ननवरे ( राहणार टाकळी माढा जिल्हा सोलापूर ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून तक्रारदार मुलीच्या घरच्यांच्या आरोपी हा ओळखीचा होता. आरोपीने मुलीला आपण देवदर्शनाला जाऊ तुझ्या आई-वडिलांना सांगू नको ते पाठवणार नाहीत असे म्हणून ८ जून 2018 रोजी तिला घरातून पळून नेले आणि गाणगापूर इथे घेऊन जात तिच्यावर तब्बल तीन दिवस बलात्कार केला.
मुलगी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी त्यानंतर पीडित मुलीचा शोध लावला त्यावेळी तिने आपल्यावर अत्याचार झालेला आहे असे सांगितले त्यानंतर आरोपीच्या विरोधात पोक्सो गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला कडक शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट संदीप ओहोळ यांनी केलेला होता.
सदर प्रकरणी एकूण नऊ साक्षीदार त्यांनी तपासले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी पॉक्सो कायदा कलम सहा अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड इतकी शिक्षा सुनावलेली आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा देखील आदेश न्यायालयाने केलेला असून ही रक्कम पुरेशी नसल्याने विधी सेवा समितीने तिला कायद्यानुसार नुकसान भरपाई देखील द्यावी असे देखील आदेश करण्यात आलेले आहेत.